Ad will apear here
Next
शौमिका महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण
शौमिका महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण
कोल्हापूर : जागतिक कृषि दिनानिमित्त राज्य सरकारने चार कोटी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत एक जुलै रोजी शिरोली (पु.) येथील प्राथमिक शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आली.

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक उपस्थित होत्या. तसेच या वेळी ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सुधाकर पाटील यांनी नैसर्गिक शेती, तर डॉ. अशोक पिसाळ यांनी ऊसलागवड या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आमदार अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून  साकारलेल्या माहिती तंत्रज्ञान व स्पर्धा परीक्षा केंद्र इमारतीचे उद्घाटन शौमिका महाडिक यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रा. शिवाजी गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी पंचायत समिती सदस्या डॉ. सोनाली पाटील, सरपंच जस्मिन गोलंदाज, ग्रामविकास अधिकारी ए. एस. कठारे व इतर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघातील मौजे तासगाव येथेही ग्रामपंचायत व प्राथमिक शाळा परिसरात शौमिका महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सरपंच सारिका कोकाटे, उपसरपंच सुशीला पाटील, अर्जुन कोकाटे, शिवाजी पाटील, नामदेव पाटील, तानाजी पाटील, ग्रामसेवक दगडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाच्या परिसरातही पालकमंत्री चंद्रकांत पाटील व शौमिका महाडिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी महापौर हसीना फरास, जिल्हा पालक सचिव देवरा, जिल्हाधिकारी सुभेदार, महापालिका आयुक्त चौधरी व इतर पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZYCBE
Similar Posts
कमला महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण कोल्हापूर  : पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर’च्या सहकार्याने येथील कमला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, रोटरीचे
जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते गॅस कनेक्शन कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, राजारामपुरी येथील स्वरांजली गॅस एजन्सीच्या वतीने शाहूनगर आणि आसपासच्या परिसरातील पात्र व गरजू महिला लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचेवाटप करण्यात आले. या वेळी नगरसेविका
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त प्रभात फेरी कोल्हापूर : जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रभातफेरीची सुरुवात झाली. या वेळी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, आरोग्य समिती सदस्या डॉ
जनावरांना लसीकरण वसगडे (कोल्हापूर) : कोल्हापूर जिल्हा परिषद व गोकुळ दूध संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांना लसीकरण करण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक व ‘गोकुळ’चे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते पार पडला. या वेळी अंबरीशसिंह घाटगे, अरुण डोंगळे व जिल्हा परिषदेतील इतर मान्यवर व

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language